
ओटवणे(प्रतीनीधी) दोन दिवसापासून जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिति निर्माण झाली असून आज सकाळी बांदा दानोली मार्गावर सपतनाथ देवस्थान नजिक मार्गावर बारामती वरून गोव्याला गेलेला नेचर डेरी चा बोलेरो टेम्पो गोव्यातून परतत असताना पाण्यात अडकला व एका बाजूला कलंडला. येथिल स्थानिकांनी धाव घेत तो टेम्पो दोन तासाच्या अथक परिश्रमाने जे सी बी च्या सहाय्याने बाहेर काढला. कालपासून पावसाचे प्रमाण कमी असले तरी ओटवणे नदीच पाणी आज सकाळ पर्यंत सपथनाथ देवस्थान जवळ रस्त्यावर ३फूट होते दोन दिवसापूर्वीच याच ठिकाणी अशी घटना घडली होती सुदैवाने या दोन्ही घटनेत जिवीत हानी झाली नसली तरी अशा घटनांमधून वाहन चालक कोणताही बोध घेत नसून वाहन चालकांचा आताताहि पणा वारंवार दिसत आहे.यावेळी सुद्धा सरमळे विलवडे येथिल युवकांनी धाव घेत मदत कार्यास सहकार्य केले त्यांचेही कौतुक होत आहे.












