सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ.शिक्षक पेढीच्या तज्ञ “संचालक पदी” विद्याधर तांबे यांची सर्वानुमते निवड !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी :  जि. प. पूर्ण प्राथ. शाळा, फोंडाघाट – गांगोवाडी, ता.कणकवली या शाळेत कार्यरत, पदवीधर शिक्षक, विद्याधर लक्ष्मण तांबे यांची सिंधू. जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित वर,सत्ताधारी भाग्यलक्ष्मी पॅनलच्या वतीने “तज्ञ संचालक” पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.श्री तांबे यांना जि. प. सिंधुदुर्गच्या “आदर्श शिक्षक” पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अनेक सामाजिक- धार्मिक संघटनावर त्यांनी विविध पदावर काम केले आहे. सहकार क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. सह्याद्री सेंद्रिय बचत गट करूळ, स्वयंदीप शेतकरी गट कोंडये यातून शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद व कार्य लक्षणीय आहे. रामेश्वर प्रासा. विकास सेवा सोसायटी करूळ, या संस्थेमध्ये काम करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचे विशेष योगदान आहे.

सध्या ते महाराष्ट्र राज्य प्राथ .पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा सिंधुदुर्ग- तालुका कणकवलीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत