वेंगुर्ले : दाजी नाईक
उद्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्या निमित्त वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ समुद्रकिनारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे “वाळूशिल्प” आरवली सोन्सुरे येथील कलाकार आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी आज साकारले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
रविराज चिपकर वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक वेळी वेगवेगळी वाळू शिल्प साकारत असतात. त्यांनी शिरोडा येथे उभारलेले वाळू शिल्प संग्रहालय ही सद्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. दरम्यान आज समुद्रकिनारी साकारलेले महामानवांचे वाळूशिल्प ही पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.












