​’सामंत’ बंधूंच्या वाढदिवसानिमित्त परशुराम कदमांची अनोखी भेट; कापडगावमध्ये ‘ग्रामरत्न’ सोहळ्याचा दिमाखदार सोहळा संपन्न!

​रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदयजी सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. किरणजी सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, युवासेना कोकण विस्तारक व माजी समाजकल्याण सभापती श्री. परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून हातखंबा जिल्हा परिषद गटात ‘ग्रामरत्न सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कापडगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
​या सोहळ्यात गावाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या विविध घटकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये गावातील सुईण बाई, पारंपरिक वैद्य, माजी सैनिक, संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिला, जुने भजनी मंडळी, आदर्श शिक्षक, दानशूर व्यक्ती, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोस्टमन, कोतवाल, सर्पमित्र आणि बैलगाडी शर्यत मालक अशा समाजघटकांना ‘ग्रामरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. परशुराम कदम यांनी या माध्यमातून जुन्या पिढीच्या कार्याला सलाम करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामुळे गावातील तरुण पिढीला आपल्या ज्येष्ठांच्या कर्तृत्वाची माहिती मिळाली.
​या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री. अण्णा सामंत, आर.डी.सी.सी. बँक संचालक श्री. रामभाऊ गराटे, उद्योजक श्री. जयूशेठ पाखरे, हातखंबा चारवाडी प्रमुख श्री. भाई तारवे, थळश्री श्री. सुरेश गुरव, सरपंच श्री. विघ्नेश कोत्रे, उपसरपंच सौ. सपना पाले यांच्यासह श्री. प्रकाश जानू पाले, श्री. बळीराम पेजे, श्री. शांताराम पेजे, श्री. चंद्रकांत कोत्रे, श्री. वसंत साळवी व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​उपस्थित प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात श्री. परशुराम कदम यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे तोंडभरून कौतुक केले. समाजात पडद्यामागे राहून सेवा देणाऱ्या खऱ्या नायकांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. परशुराम कदम यांनी उपस्थितांचे आभार मानताना, असाच ‘ग्रामरत्न सन्मान’ सोहळा संपूर्ण हातखंबा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.