संगीत दिग्दर्शक संदीप पाळेकर यांचा पवई येथे सन्मान!

मसुरे | झुंजार पेडणेकर :मूळ देवगड तालुक्यातील पाळेकरवाडीचे सुपुत्र व मुंबई येथील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक संदीप पाळेकर यांचा पवई – मुंबई येथील श्री दुर्वाप्रिय गजानन मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. कीर्तन सोहळ्याचे आयोजन या मंदिरात करण्यात आले होते. त्यावेळी पाळेकर यांनी सांगितबद्ध केलेल्या श्री दुर्वाप्रिय गजाननाच्या आरतीचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. इतर मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संदीप पाळेकर यांनी संगीतबद्ध केलेली तसेच गायलेली अनेक गीते यापूर्वी प्रसिद्ध झालेली आहेत. संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गणपती आरतीचे लेखक व निर्माते विकास लांबोरे(लांजा ), गायिका साक्षी कोकाटे (राजापूर ), पो. उपनिरीक्षक रवींद्र कोलापटे, ज्ञानेश येडगे, विनायक धोपट, निलेश किंजळकर तसेच मंदिराचे सर्व ट्रस्टी, आयोजक मंडळी उपस्थित होते.