शिरगाव ( प्रतिनिधी ):
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या श्रावणी हिंदळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान
वर्षानिमित्त क्वाॉटमं युग क्षमता आणि आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाची श्रावणी हिंदळेकर सहभागी झाली होती. तिने राष्ट्रीय स्तरावरील या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यशाबद्दल तिने मिळविलेल्या संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, प्राचार्य समीर तारी, प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.













