रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात राजापूर तालुक्यात सर्वाधिक 122मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 55.67 मि.मी. पाऊस झाला असून एकूण 501 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अनुक्रमे आजपर्यंत झालेली पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. मंडणगड- 35 (1905), दापोली- 33 (2053), खेड- 46 (1402), गुहागर- 13 (1023), चिपळूण- 58 (1600), संगमेश्वर- 102 (1455), रत्नागिरी – 13 (1115), लांजा – 79 (1602), राजापूर- 122 (1709) असा पाऊस झाला आहे.











