माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे असलेल्या श्री सूर्यनारायण मंदिरात रथसप्तमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचं गावचे असल्याने उत्सवाला नेहमी प्रमाणे उपस्थित होते.
या उत्सवात ह.भ.प अभय बुवा घांग्रेकर यांची कीर्तने झाली.
तसेच सौ स्वाती आपटे व मंदार आपटे यांचा स्वर साथीचे रंग प्रीतीचे हा बहारदार कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक यांनी केले.
तर प्रख्यात ऑर्गन वादक आदित्य ओक,अभिनेते विघ्नेश जोशी यांचा गोविंदबुवा पटवर्धन यांच्या वरील गोविंदगुण गौरव हा कार्यक्रम झाला यावेळी ख्यात किर्त गायक राजाभाऊ शेंबेकर,श्वेता जोगळेकर यांचे गायन झाले तर श्रीरंग जोगळेकर,हेरंब जोगळेकर यांनी साथ दिली.
रथसप्तमी दिनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड गायत्री मंत्र पठण झाले,महाप्रसाद व रात्री पोंक्षे कुटुंबीयांचा रंगल्या रात्री अशा हा कार्यक्रम रंगला.याचे निवेदन सौ स्मिता पोंक्षे, गौरव पोंक्षे यांनी केले.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.उत्सवात महिलांसाठी हळदीकुंकू झाले.सकाळ संध्याकाळ आरती मंत्रपुष्प झाले.
उत्सवाअंती संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पोंक्षे यांनी सर्वांचे आभार मानले.











