राजापूर पत्रकार संघाचा पत्रकार दिन व विशेष पुरस्कार वितरण सोहळा
राजापूर प्रतिनिधी : ब्रीटीश राजवटीत अनेक बंधने असताना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून समाज प्रबोधनाचे केलेले काम आजही प्रेरणादायी असे आहे. याच दर्पणकारांचा निर्भिड पत्रकारीतेचा वसा घेऊन काम करत त्यांचा वारसा जपण्याचे काम राजापुरातील पत्रकार करत आहेत असे गौरवोद्गार राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी येथे काढले.
राजापूर शहर आणि तालुक्याच्या विकासात राजापुरातील पत्रकारांचे मोलाचे असे योगदान असल्याचे नमुद करतानाच पत्रकारीता करत असताना समाजात चांगले काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान करून राजापूर पत्रकार संघ करत असलेले काम भावी पीढीला आणि समाजाला प्रेरणा देणारे ठरणार आहे असेही अॅड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
राजापूर पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी ६ जानेवारी रोजी ’पत्रकार दिन’ व विशेष पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकार संघाचे वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. सौ. खलिफे बोलत होत्या.
यावेळी अॅड. सौ. खलिफे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेल्या कार्याचा गौरपुर्ण उलेख करत त्यांनी लिहिलेले साहित्य हे आजही समाजासाठी दिशादर्शक असे असल्याचे नमुद केले. तर राजापूरातील पत्रकारांचे कौतुक करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची स्पर्धा न करता ही मंडळी एकदिलाने काम करतात, दरवर्षी समाजात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्ती संस्थांचा शोध घेवून पुरस्कार देवून सत्कार करतात ही निश्चीतच कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
राजापूर नगर वाचनालय सभागृहात राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमप्रसंगी व्यासपीठावर राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसिलदार विलास सरफरे, राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष संजय ओगले, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजापूर पत्रकार संघाचे वतीने राजापुरातील डॉक्टर पी. एस. बावकर यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार, विश्वनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अक्षता रहाटे यांना आदर्श शिक्षक, सोलगाव येथील शेतकरी सई पंडीत यांना आदर्श शेतकरी तर ग्रामीण समाज प्रबोधिनी येळवण या संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
तर शिक्षण घेत असताना विशेष प्राविण्य मिळविलेल्या पत्रकारांच्या मुलांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये श्रीपाद प्रमोद चव्हाण, सृष्टी संतोष मोंडे, वरद विनोद पवार, सिध्दी नरेंद्र मोहिते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी सत्कार मुर्तींच्या वतीने अक्षता रहाटे व सई पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले, तर विद्यार्थ्यांच्या वतीने सृष्टी मोंडे व सिध्दी मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अमित यादव, संदीप मालपेकर, प्रकाश मांडवकर, प्रभात पाध्ये यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकार संघाच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड यांनी पत्रकार संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला व पत्रकार संघाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांबाबतही त्यांनी माहिती दिली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी संघाच्या आजवराच्या कामाची माहिती देतानाच भविष्यात संघाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, नगरसेवक अॅड. जमिर खलिफे, सुबोध पवार, अफरोज झारी, जिल्हा बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक संजय बाकाळकर, कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, सीईओ जितेंद्र पाटकर, भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे, महसुल अधिकारी बाजीराव पाटील, पोलीस कर्मचारी नरेश लिंगायत, राजापूर अर्बन बँक संचालक जयंत अभ्यंकर, प्रसाद मोहरकर, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे जगदीश पवार-ठोसर,रास्त धान्य दुकानदार संघटनचे अध्यक्ष अॅड. महेश नकाशे, माजी नगरसेवक देवदत्त वालावलकर, जितेंद्र मालपेकर, अभिजित तेली, डॉ. शेखर पाध्ये, डॉ. सागर पाटील, डॉ. सुयोग परांजपे, सुहास पंडीत, ठेकेदार डी. एम. चव्हाण, राजापूर प्रतिष्ठानचे मोहन पाडावे, चिरेखान संघटनेचे गुरू शिंदे, अरविंद लांजेकर, मनोज सप्रे, प्रसन्न बापट, वैष्णवी कुळये, संतोष कुळये, अशफाक मापारी, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, शितल पटेल, माधवी हर्डीकर, जी. आर. कुलकर्णी, व्यापारी प्रदीप भाटकर, प्रदीप मोहिते, नामदेव नागरेकर नॅशनल इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक शकिल मोकाशी, गफूर मापारी, सतीश बडंबे, नाना कुवळेकर, यांसह उपस्थीत मान्यवरांनी पत्रकार दिनानिमत्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कतीक क्षेत्रातील मान्यवर मंडळी नवजीवन हायस्कुल व विश्वनाथ विद्यालयातील मधील विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलन व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अॅड. हुस्नबानू खलिफे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रकाश नाचणेकर यांनी तर पुरस्कार वितरणाचे सुत्र संचालन विनोद पवार, संतोष मोंडे व राजेंद्र बाईत यांनी केले. तर आभार शरद पळसुळेदेसाई यांनी मानले.
यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सल्लागार महेश शिवलकर, भास्कर खडपे, संघाचे पदाधिकारी व सदस्य राजेंद्र जोगळे, संतोष शिंदे, प्रकाश वळंजू, गोकुळ कांबळे, संदीप गादीकर, मनोहर धुरी, समीर सुतार, आदित्य बाकाळकर, किरण टिळेकर, सौ. सीमा सावंत आदी उपस्थीत होते.
प्रकृती बरी नसतानाही चंदूभाई देशपांडे यांची उपस्थिती
राजापूर पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीं आदर्श संस्था म्हणून येळवणच्या ग्रामीण समाज प्रबोधिनी संस्थेचा गौरव करण्यात आला. या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे यांनी यासाठी आवर्जुन उपस्थीती लावली. प्रकृती बरी नसताना व सभागृहात जिने चढून येणे शक्य नसल्याने त्यांनी सभागृहाबाहेर गाडीत बसून संपुर्ण कार्यक्रम ऐकला. यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहातुन खाली येऊन चंदूभाई देशपांडे यांचा सन्मान केला. सभागृहात हा पुरस्कार संस्थेचे पदाधिकारी संभाजीराव केळुस्कर व सहकाऱ्यांनी स्विकारला.











