सावंतवाडीतील सौरभ सुकी यांचे निधन

सावंतवाडी :
सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी सौरभ विजय सुकी (३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचे प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. कॉन्ट्रॅक्टर गौरव सुकी यांचे ते भाऊ होत.