फोंडाघाट विकास सेवा सोसायटीमध्ये भात खरेदीचा शुभारंभ !
फोंडाघाट /कुमार नाडकर्णी– अखेर फोंडाघाट विकास सेवा सोसायटीमध्ये चालू हंगामाचा खरेदी शुभारंभ सरपंच सौ. संजना आग्रे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तर बबन हळदिवे यांचे हस्ते पहिल्या गोणीला पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमन राजन नानचे व्हा.चेअरमन श्रद्धा सावंत, संदेश पटेल, उपसरपंच तन्वी मोदी, निरंजन सामंत, श्यामसुंदर सावंत, सुदेश लाड, प्रसाद देसाई, दुर्वा गोसावी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. संजना आग्रे यांनी किमान आधारभूत दराने भात खरेदी केंद्रावर भात विक्री केल्यास, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. असे सांगितले.खाजगी दलालांना भात विक्री करण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी नोंदणी करून सोसायटीला भात विक्री केल्यास सर्वोच्च रुपये २३६९/- क्विंटल दर मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असे विचार अध्यक्ष राजन नानचे यांनी काढले. मात्र चालू वर्षी पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे इ पिक व सातबारा करणे शासनाकडून अंतिम टप्प्यात आहे. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते……












