मुणगेत बाळासाहेब पंतवालावलकर यांना मान्यवरांचे अभिवादन!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे माजी अध्यक्ष श्रीपाद शंकर तथा बाळासाहेब पंतवालावलकर यांचे मुंबई येथे निधन झाले. मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्था सांभाळताना बाळासाहेबांनी घालून दिलेले आदर्श समोर ठेवून काम करा. तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. बाळासाहेब आज आपल्यातून गेले असले तरी त्यांचे आदर्श माजी विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत असे मत श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरसिंह तथा न. ना.पंतवालावलकर यानी व्यक्त केले.

(कै.) बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या पश्चात संस्थेसाठी भरीव असे योगदान बाळासाहेब यांनी दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंह पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर व विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, कार्यकारिणी सदस्य सदाशिव लब्दे, रत्नदीप पुजारे, विजय पडवळ, धर्माजी आडकर, विश्वास मुणगेकर, रवींद्र सावंत, वसंत शेट्ये, संतोष लब्दे, हरी परुळेकर, देवदत्त पुजारे, किरण गुरव, सुरबा सावंत, देवजी रासम, सुनील हिर्लेकर, अरविंद सावंत, सुनील सावंत, प्रसाद बागवे, सी बा मुणगेकर, संजय बांबूळकर, प्रकाश मुरकर, नंदकुमार बागवे, संतोष सावंत, रवींद्र सावंत, स्वप्नील कांदळगावकर, एन एल बागवे, भरत सावंत, रमाकांत सावंत, बाबू तळगावकर, गुरुप्रसाद महाजन, मनोज मुणगेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी पंतवालावलकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.