बांदा : प्रतिनिधी
मडूरा येथील श्रीदेवी माऊली सार्वजनिक नवरोत्सवानिमित्त मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी देवीची विधीवत पूजा व घटस्थापना कार्यक्रम झाला. सायंकाळी परबवाडी, देऊळवाडी,, रेडकरवाडी व डीगवाडी मंडळांची भजने झाली.
मंगळवार २३ रोजी सायंकाळी ८ वा. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन होईल. रात्री ९ वा. मोरेश्वर दशावतार मंडळाचे नाटक होईल. बुधवार २४ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने, ८ वा. दांडिया नृत्य, ९ वा. मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
गुरुवार २५ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने, ८ वा. दांडिया नृत्य, ९ वा. दत्त माऊली दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. शुक्रवार २६ रोजी सायंकाळी ५ वा. फुगडी, ६ वा. स्थानिकांची भजने, ७ वा. गोव्यातील युवा कीर्तनकार ह. भ. प. भूमी आईर हिचे सुश्राव्य कीर्तन होईल. त्यांना अमोल मांजरेकर हार्मोनियम तर सुरज मोरजकर तबला साथसंगत करतील. रात्री ९ वा. आरोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
शनिवार २७ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने, ९ वा. वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार २८ रोजी सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होईल. सोमवार २९ रोजी सकाळी १० वा. रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ६ वा. स्थानिकांची भजने, रात्री ८ वा. फुगडी स्पर्धा होईल. मंगळवार ३० रोजी सायंकाळी ७.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, त्यानंतर महिलांसोबत दीपोत्सव, महाआरती व तीर्थप्रसाद होईल. रात्री ९ वा. खुली दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
———–












