. ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावातील सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर पुरस्कृत बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने शुक्रवारी ३० जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 रोजी ओटवणे ग्रामपंचायत नजिक समाधी मैदानावर भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारी ही स्पर्धा पूर्णतः खुली राहणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत गोवा महाराष्ट्रा बरोबर अन्य राज्यातील खेळाडू या क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळणार आहेत.
लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत निवडक १६ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. ओटवणे सारख्या ग्रामीण भागात एवढी मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा होत असल्याने क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १,००००२ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक ५०,००२ रूपये व ध्रुव चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाना प्रत्येकी १५००० रूपयाचे पारितोषिक तसेच स्पर्धेतील मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी उदीत गांवकर ७८२०८१४३६५ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर आणि आकाश मेस्त्री यांनी केले आहे.ही स्पर्धा युट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठीही प्रेक्षकांनी मैदानात उपस्थिती दर्शवावी असेही आवाहन या स्पर्धेचे पुरस्कर्ते बबलू गावकर यांनी क्रीडा रसिक,खेळाडू यांना केले आहे.












