विलास रावराणे यांचे निधन
वैभववाडी प्रतिनिधी :
सोनाळी येथील कै. विलास भास्कर रावराणे वय 75 यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. वैभववाडीचे माजी सभापती अरविंद रावराणे यांचे ते बंधू होतं.
विलास रावराणे यांनी मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये तब्बल 35 वर्षे सेवा बजावली होती. सेवा बजावत असताना त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचविले होते. तर अनेकांना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मुंबई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन, नातवंड असा परिवार आहे.













