लांजा ( प्रतिनिधी): आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक योगेश कावतकर यांच्या वतीने बुधवारी भटवाडी शाळा क्र.३ व अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेवक योगेश कावतकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सेवक योगेश कावतकर यांच्यासह
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.मंजिरी कोत्रे,उपाध्यक्षा सौ.प्रिती कोत्रे, सदस्य सौ.संजना चव्हाण.सौ.रिया कोत्रे, शिक्षक नरेश कांबळे, शांताराम लांबोर, अंगणवाडी सेविका सौ.मयुरी आंबेकर मदतनीस सौ.तन्वी पेडणेकर तसेच गणेश सावंत, रमाकांत सावंत ,स्वप्नील खटावकर,अभय शेट्ये, ऋषिकेश सावंत,सौ.स्नेहल सावंत, अलंकार जाधव आदी उपस्थित होते.











