लांजा (प्रतिनिधी) लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवशी आज बुधवारी सर्व स्तरातील मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. लांजा रेस्ट हाऊस येतील आमदार यांच्या निवासस्थानी या शुभेच्छापर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज बुधवारी सात जानेवारी रोजी आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लांजा येथील प्रख्यात उद्योजक विकास शेट्ये, त्यांचे सुपुत्र प्रवीण शेट्ये यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. याचबरोबर शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, लांजा तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष गणेश लागण व पदाधिकारी, नगराध्यक्ष सावली कुरूप, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप आदींसह विविध राजकीय पक्ष, संस्था, सामाजिक संस्था व्यापारी उद्योजक वकील इंजिनियर, आदी सर्वच क्षेत्रातील मंडळी आमदार किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
या सर्व मंडळींकडून आमदार किरण सामंत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छा देण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता.












