यशतेज फाउंडेशनतर्फे भव्य दिवाळी किल्ले बनवा स्पर्धा; ऐतिहासिक दुर्गसंवर्धनाचा जागर

मंडणगड | प्रतिनिधी : दिवाळीच्या पारंपरिक किल्ले बनविण्याच्या संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने यशतेज फाउंडेशनतर्फे ७ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘दुर्ग संवर्धन किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मंडणगड, दापोली, खेड, महाड आणि महाबळेश्वर तालुक्यांतील ऐतिहासिक किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील मंडणगड (चित्रदुर्ग) व बाणकोट किल्ला, दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला, खेड तालुक्यातील पालगड, रसाळगड, भरतगड, महिपतगड व सुमारगड, महाड तालुक्यातील रायगड आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड या किल्ल्यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला छोटी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिवाळीतील किल्ले उभारण्याची परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता त्यातून इतिहासाचे ज्ञान, दुर्गप्रेम, शिवकालीन शौर्य आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. ‘किल्ले बनवा, इतिहास वाचवा’ हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थी, शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यशतेज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी सौ. शिल्पा ऐनकर डॉ. अक्षय पाटणकर सुरज म्हाब्दी शहानवाज सावरटकर ॲड. यश घोसाळकर श्रीकांत जाधव अमोल कोलंबेकर राजेश पारेख प्राजक्ता ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.