खेड (प्रतिनिधी) :- लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात पीफास रसायनामुळे निर्माण होणारा धोका आणि प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला झाला असून या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीने भव्य आणि ऐतिहासिक असा मोर्चा गुरुवारी सकाळी 11 वा. काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले. मोर्चाच्या सुरुवातीपासूनच “बंद करा! बंद करा! लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा!”, “कोण म्हणतंय करणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही!” अशा घोषणांनी संपूर्ण औद्योगिक वसाहतीचा परिसर दणाणून गेला.

कंपनीविरोधातील या तीव्र जनआक्रोशाची दखल घेण्याची गरज मात्र महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाला वाटली नाही. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने चोख पोलिस बंदोबस्त उभारला होता. महामार्गापासून कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत मोर्चेकऱ्यांनी मोर्चा काढत व घोषणा देत आपला संताप नोंदवला. हा मोर्चा कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी मोर्चा अडवून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला कंपनीमध्ये जाऊन चर्चा करण्याची परवानगी दिली. शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनाशी चर्चा करून निवेदन सादर केले. मात्र बाहेर आल्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी स्पष्ट केले की या बैठकीत कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यांनी असा आरोप केला की कंपनी प्रशासनाने सर्व प्रश्नांना उडवा–उडवीची उत्तरे दिली. सर्वांत गंभीर बाब म्हणजे कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी या चर्चेसाठी उपस्थित नव्हता, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील संपूर्ण वेळ अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यामुळे कोकणवासीयांच्या आरोग्याची, पाण्याची आणि पर्यावरणाची काळजी प्रशासनाला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. यामुळे ही परिस्थिती अधिक आश्चर्यकारक ठरली कारण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘कोकणातील निसर्गसौंदर्याला हानी पोहोचवणारे कोणतेही प्रकल्प येथे चालू देणार नाही’ असे स्पष्टपणे जाहीर केले होते. तरीही कंपनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पाहून नागरिक आणि संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी उपस्थित असलेला संताप आणि चिंता स्पष्टपणे जाणवत होती. संघर्ष समितीने पुन्हा इशारा दिला की, नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल. लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात पीफास रसायनामुळे निर्माण होणारा धोका आणि प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र झाला असून या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीने भव्य आणि ऐतिहासिक असा मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले. मोर्चाच्या सुरुवातीपासूनच “बंद करा! बंद करा! लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा!”, “कोण म्हणतंय करणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही!” अशा घोषणांनी संपूर्ण औद्योगिक वसाहतीचा परिसर दणाणून गेला.
कंपनीविरोधातील या तीव्र जनआक्रोशाची दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस विभाग सतर्क दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने चौक–चौकात बंदोबस्त उभारला होता. महामार्गापासून कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत मोर्चेकऱ्यांनी मानवतारे उभारून आपला संताप नोंदवला.
मोर्चा कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी मोर्चा अडवून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला कंपनीमध्ये जाऊन चर्चा करण्याची परवानगी दिली. शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनाशी चर्चा करून निवेदन सादर केले. मात्र बाहेर आल्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी स्पष्ट केले की या बैठकीत कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

त्यांनी असा आरोप केला की कंपनी प्रशासनाने सर्व प्रश्नांना उडवा–उडवीची उत्तरे दिली. सर्वांत गंभीर बाब म्हणजे कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी या चर्चेसाठी उपस्थित नव्हता, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील संपूर्ण वेळ अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यामुळे कोकणवासीयांच्या आरोग्याची, पाण्याची आणि पर्यावरणाची काळजी प्रशासनाला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
ही परिस्थिती अधिक आश्चर्यकारक ठरली कारण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘कोकणातील निसर्गसौंदर्याला हानी पोहोचवणारे कोणतेही प्रकल्प येथे चालू देणार नाही’ असे स्पष्टपणे जाहीर केले होते. तरीही कंपनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पाहून नागरिक आणि संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी उपस्थित असलेला संताप आणि चिंता स्पष्टपणे जाणवत होती. संघर्ष समितीने पुन्हा इशारा दिला की, नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल.










