आमदार किरण सामंत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त अमित साळवी ह्यांचा अनोखा उपक्रम

पोलिस बांधवांना शुगर टेस्ट मशीन किट वाटप करून जपली समाजिक बांधिलकी

राजापूर (वार्ताहर): लांजा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांचा वाढदिवस ७ जानेवारी रोजी साजरा झाला. यावेळी तालुक्यातील पाचल येथील तरूण उद्योजक अमित साळवी यांनी लांजा राजापूर व नाटे पोलिस स्थानकांतर्गत असलेल्या सुमारे १५० पोलिस बांधवाना पट्टी व शुगर टेस्ट मशीन अश्या एकत्र किट चे वाटप केले.
आमदार किरण सामंत व युवासेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या सदस्या अपूर्वा सामंत यांच्या हस्ते पोलिस बांधवाना “शुगर टेस्ट मशीन किट” चे वाटप करण्यात आले. मशीन किट मुळे आता पोलिस बांधवाना आपल्या घरीच स्वतःच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी करता येणार आहे.
साळवी कुटुंबीय गेली अनेक वर्षे पाचल येथे अनेक समाजिक कामांमध्ये सहभागी होत असते. अमित साळवी हे आपला व्यवसाय सांभाळून समाजिक बांधिलकीतून जनतेची सेवा करत असतात. अमित साळवी ह्यांनी एक वेगळा व अनोखा उपक्रम राबविला असून त्यांच्या ह्या उपक्रमाचे लांजा व राजापूर तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.