वायंगणी गावाच्या विकासासाठी सदैव भाजपची साथ राहील : मनिष दळवी

गावातील विविध ११ विकास कामांसाचे झाले भूमिपूजन..

वेंगुर्ले |  प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि आडेली जिल्हा परिषद मतदार संघाचे भावी जि.प. सदस्य मनिष दळवी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वायंगणी गावातील ११ विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना श्री. दळवी यांनी वायंगणी गावाच्या विकासासाठी सदैव भाजपची साथ राहील असे सांगितले.
वायंगणी येथील या भुमिपुजन कार्यक्रम सोहळ्याला सरपंच अवी दुतोंडकर, भाजप पदाधिकारी प्रशांत खानोलकर, रवी धोंड, हर्षद साळगावकर, प्रशांत प्रभू, विनू मठकर, अंतू केलजी, सगळे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आनंद दाभोलकर, शैलेश प्रभू आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

गावातील गव्हाणी मंदिर ते दाभोली गोठण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, रेडी मालवण मुख्य रस्ता ते तळेकरवाडी विठ्ठल मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, दाभोली वायंगणी रस्ता इ. जि. मा. ५२ मजबुतीकरण करणे, वायंगणी आवेरा कोंडाची मळी येथे बंधारा बांधणे, वायंगणी शाळा नं. १ अंगणवाडी दुरुस्ती करणे, वायंगणी पोयंडीवाडी जवळील समुद्र किनारी जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे, वायंगणी सुरंगपाणी येथील पोल शिफ्टिंग करणे, दाभोली वायंगणी रस्ता पोल शिफ्टींग करणे, हरिजनावाडी ते हरिचणगिरी रस्ता, हरिचरणगिरी तिठा ते हरिचरणगिरी रस्ता, वायंगणी शाळा नं. २ छप्पर दुरुस्ती या कामांचा समावेश आहे.