मंडणगड प्रतिनिधी : – मंडणगड तालुक्यात खंडीत झालेल्या नाट्य चळवळीस नव्याने उर्जिताव्यवस्था मिळावी या उद्देशाने 9 जानेवारी 2025 रोजी शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रांगणात सुमारे अडीच हजार वर्षापुर्वीचे कालखंडातील कथानकावर आधारीत सादर करण्यात आलेल्या अजातशत्रू या दोन अंकी ऐतिहासीक नाटकास तालुक्यातील कला रसिक प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. दहगाव येथील युवा नाट्यकर्मी योगेश दळवी यांच्या पुढाकाराने मैत्रय संघ ही निर्मीती संस्था व लेखक बाळासाहेब थोरात यांनी लिहलेले नाटक तालुक्यातील नाट्य कला रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले मंचावर एकूण तीस कलाकरांनी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले. अजातशत्रू (इ.स.पु. 493 के इ.स.पु.460) हा मगध वंशीय सम्राट बिंबीसार यांचा पुत्र होता हा भगवान महावीर आणि गौतम बौध्द समकालीन राजा होता. त्याची राजवटीची (इ.स.पू. 554- 527 किंवा इ.स.पू. 493 – 462) अशी कालमर्यादा सांगतात. त्याने जबरदस्तीने वडिलांकडून मगधचे राज्य ताब्यात घेतले आणि त्यांना तुरूंगात टाकले. त्याने लिच्छविंनी राज्य केलेल्या वज्जीविरूद्ध युद्ध केले आणि वैशाली प्रजासत्ताक जिंकला. बुद्धाच्या महापरिनर्वाणानंतर प्रथम बुद्ध परिषद आयोजन राजगृह येथे करण्यात आली होते या परिषदेसाठी राजा अजातशत्रू यांनी राजश्रय प्रदान केला होता.या कालखंडातील घटनांचे नाट्यमय रुपांतर करण्यात आले आहे. सत्तास्थापनेनंतर अजातशत्रूचे या व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्वात शांतीचे मार्गाने झालेले परिवर्तन व त्या नंतर धम्मांकरिता केलेल्या कार्यावर नाटकाने प्रकाश टाकला आहे. अनेक वर्षानंतर तालुक्यात झालेले हे उत्तम दर्जाच वैचारीक नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, दिलीप मराठे, मनोज मर्चंडे, अनंत नलावडे यांनी मेहनत घेतली.









