देवगड–जामसंडे शहरात जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे ही विकासकामे मंजूर झाली
या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भूजबळ, उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा उषःकला केळुस्कर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले, नगरसेविका प्रणाली माने, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेविका रुचाली पाटकर, आद्या गुमास्ते, स्वरा कावले, मनिषा जामसंडेकर, सौ. नंदिनी कोयघाडी, मृणाली भडसाळे, व्ही. सी. खडपकर, सुभाष धुरी, गणपत गावकर आदींसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या विकासकामांमुळे देवगड–जामसंडे शहरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, संरक्षक भिंती, पायवाटा, गार्डन, ओपन स्टेज आदी कामांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
प्रभागनिहाय मंजूर विकासकामे पुढीलप्रमाणे :देवगड–निपाणी मुख्य रस्ता ते माधव भंडारी घरापर्यंत डांबरीकरण, प्रभाग क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, चिरेबंदी पायवाट बांधणे, विविध ठिकाणी संरक्षक भिंती, गटारांवर स्लॅब, बंदिस्त गटारे व पायवाट काँक्रिटीकरण, लघुनळ योजनेचे चबुतरे व पाईप लाईन बदल, अंतर्गत वसाहतीतील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, विहीर खोदणे व बांधकाम, पाणंद रस्ते, नवीन रस्ते, गार्डन निर्मिती, कंपाउंड व ओपन स्टेज उभारणी, तसेच अनेक प्रभागांमध्ये पायवाट व रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदी एकूण २६ विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
भाजपच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात समतोल व सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असून आगामी काळातही अधिकाधिक विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













