शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नांदरुख गावात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यात जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत नांदरुख साळकुंभा मुख्य रस्ता ते साळकुंभा देवस्थानकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, नांदरुख पलीकडचीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, पंतप्रधान आवास योजनेतील करमाळेवाडी येथील विलास गावडे यांच्या घरकुलाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. मागील अनेक वर्षे रखडलेली काही विकासकामे तसेच जनतेच्या मागणीनुसार वाडी वस्तीवर असलेली विकासकामे आगामी काळात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्याने मंजूर केली जातील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी सरपंच रामचंद्र चव्हाण, उपसरपंच दशरथ संभाजी पोखरणकर, राजश्री कांबळी, समिक्षा चव्हाण, ग्रामअधिकारी गणेश नलावडे, घनःशाम परब, सुश्रिया चव्हाण, माणसी चव्हाण, बबन चव्हाण, चंद्रहास चव्हाण, शामसुंदर चव्हाण, संगीता चव्हाण, जान्हवी चव्हाण, रसिका चव्हाण, वैष्णवी चव्हाण, अंकीता चव्हाण, संजय चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिव्या चव्हाण, सिद्धेश साळकर, दाजी लाड, संजय चव्हाण, महादेव चव्हाण, अरुण चव्हाण, दिपक चव्हाण, किरण चव्हाण, सौ कांबळी, मेस्त्री, बाबू मांजरेकर, बाळू पोखरणकर, पप्पू पोखरणकर, बाबल पोखरणकर, हेमंत मेस्त्री, सुंदर मांजरेकर, सचिन नामनाईक, राजा मेस्त्री, महेश कोचरेकर, बंड्या किडये, अमित गावडे, विलास गावडे, संदीप मालवणकर, आदित्य कांबळी, अमित वस्त, रुपेश गावडे, रुद्र चव्हाण यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.













