मंडणगड प्रतिनिधी दि. 11- निवृत्त महसुल कर्मचारी संघटना तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या कर्मचारी संघटनेच्या 3 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सभेत सन 2026 साठी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी एस.व्ही. शिर्के, उपाध्यक्षपदी ए.आय. जोगिलकर, सचिवपदी एम.एस. धामणस्कर, उपसचिवपदी एन.एस.मोरे, खजिनदारपदी एम.व्ही जोशी, सहखजिनदारपदी व्ही.एस. नगरकर, सल्लागारपदी ऐ.आय.वावेकर महिला प्रतिनिधीपदी श्रीमती.एल.यु. मुकदाम यांची निवड झाली. सदस्यपदी एस.जी. गावडे, बी.एस.जाधव, एन.बी. नाकती, व्ही.डी. शिगवण, डी.के.जाधव, एस.एम.जाधव, जे.टी. कांबळे, पी.जी. हातमकर, एस.बी. भेकत, श्रीमती.एम.एन. मोरे, एस.एस.पारदूले यांची निवड झाली. नवनिर्वाचीत कार्यकारिणी सदस्यांचे तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी
निवृत्त महसुल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले एस.व्ही. शिर्के, यांचे अभिनंदन करताना पदाधिकारी.











