मसुरे | झुंजार पेडणेकर : त्रिंबक येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच सुचिता घाडीगावकर,ग्रामपंचाय त अधिकारी सौ माधुरी कामतेकर, सदस्य नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सागर चव्हाण, माजी उपसरपंच आशिष बागवे, सदस्य सपना तेली, पोलीस पाटील गणेश गोसावी, सिताराम सकपाळ, लाभार्थी मीराबाई गावडे, माजी सरपंच चंद्रशेखर सुतार, ग्रामस्थ प्रकाश परब, वर्षा गावडे, पुर्वा भाट, जनाबाई गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रीष्मा बागवे, अस्मि वर्देकर, बाळा सुतार, विशाल मेस्त्री, आदी उपस्थित होते. तसेच यावेळी एम आर इ जी एस योजनेतील विहीर, गांडूळ खत युनिटचे उदघाट्न करण्यात आले.लाभार्थी संतोष सावंत उपस्थित होते.












