बांदा : प्रतिनिधी
बांदा मुस्लिमवाडी येथील सायराबी हुसेन खतीब (६७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा गोवा येथे रुग्णालयात दाखल केले असता तेथे निधन झाले. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा उपसरपंच जावेद खतीब यांच्या त्या मातोश्री होत.











