मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी दिपक पाटकर

स्वीकृत नगरसेवकपदी महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर

सभागृहात शिवसेना-भाजपा महायुती म्हणून एकत्र

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक दिपक पाटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना गटनेत्या पुनम चव्हाण सूचक व नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचे अनुमोदन असलेला उमेदवारी अर्ज दिपक पाटकर यांनी शिवसेना-भाजपा नगरसेवकांच्या उपस्थितीत दाखल केला. एकमेव अर्ज असल्याने नगराध्यक्षा सौं. ममता वराडकर यांनी दिपक पाटकर यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड जाहिर केली.

 

स्विकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तर भाजपा कडून रविकिरण तोरसकर यांच्या नावांची शिफारस असल्याने त्यांचीही निवड नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जाहिर केली. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व दोन्ही स्वीकृत नगरसेवक यांचे नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांनी अभिनंदन केले.

 

मालवण नगरपरिषद सभा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर, उबाठा गटनेते महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर यांसह नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी कचरा ठेका विषयावर बोलण्याची परवानगी मागितली. मात्र नगराध्यक्षा यांनी सभेच्या अजेंद्यावर विषय नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी आचरेकर व अन्य नगरसेवक यांनी पुन्हा मागणी केल्यावर नगराध्यक्षा यांनी फक्त चर्चा करूया असे सांगितले. यावेळी सुदेश आचरेकर यांनी भुमिका मांडली. तर प्रशासकीय कालावधीतील कामाची माहिती उपलब्ध व्हावी असे मंदार केणी यांनी सांगितले. महेंद्र म्हाडगुत,

यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे नगरसेवकांनी मागितलेली माहिती तात्काळ मिळावी असे सांगितले. तर तपस्वी मयेकर यांनी सभागृह कामकाज ऑनलाईन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी महेश कांदळगांवकर यांनीही चर्चेत सहभागी होत प्रशासकीय कालावधीतील कामाची माहिती उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, प्रशासकीय कार्यकाळातील माहिती घेऊन पुढील भुमिका घेतली जाईल असे स्पष्ट केले.

 

*मालवण शहराच्या विकासासाठी काम करूया : नगराध्यक्षा*

 

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या मालवण शहाराच्या सर्वांगीण विकास हेच आपले लक्ष आहे. सर्वांनी एकत्रितपणे शहर विकासासाठी काम करूया. गेल्या चार वर्षात प्रशासकीय कारभार होता. या कालावधित जी कामे झाली त्याचीही माहिती घेतली जाईल. एकूणच मालवण शहरातील नागरिकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध होण्यासाठी जे गरजेचे आहे त्या दृष्टीने भुमिका घेतली जाईल. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्पष्ट केले.

 

*सर्वांचा आभारी : उपनगराध्यक्ष दिपक पाटकर*

 

पक्षनेतृत्वाने संधी दिली आणि सभागृहाने माझी बिनविरोध निवड केली. मी सर्वांचा आभारी आहे. मालवण शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी कटीबद्ध राहणार आहे. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया असे दिपक पाटकर यांनी सांगितले. यावेळी स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर व रविकिरण तोरसकर यांनीही आभार व्यक्त केले. नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याची मागणीही तोरसकर यांनी केली.

 

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले अभिनंदन*

 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नगरपरिषद सभागृहात उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचे अभिनंदन केले. यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, परशुराम पाटकर, मोहन वराडकर, निकीत वराडकर, राजा गांवकर, विजय चव्हाण, राजेश गांवकर, शेखर गाड, जॉन नरोना, स्मृती कांदळगांवकर, अर्चना मिठबावकर, जगदीश गांवकर, भाई मांजरेकर, प्रसाद आडवणकर, यशवंत गांवकर, किसन मांजरेकर, सचिन मोर्वेकर, संदीप मालंडकर, संदीप भोजणे, अखिलेश शिंदे, मंदार लुडबे, तेजस लुडबे, विलास मुणगेकर, नंदू देसाई, दत्तात्रय नेरकर, नरेश हुले, नितेश पेडणेकर, जोती तोरसकर, मुन्ना फाटक, सौ. तायशेटये यांसह अन्य नागरिक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.