शिरोडा येथील रितेश जाधव चा भाजप तर्फे करण्यात आला सत्कार..

केरळ (काॅलम) येथील एनसीसी च्या नॅशनल कॅम्प मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्याने सन्मान..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भारत सरकारच्या संरक्षण दलाने केरळ (काॅलम) येथे एनसीसी चा नॅशनल कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्प मध्ये देशातील सर्व राज्यातील एनसीसी च्या विद्यार्थी यांनी भाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र राज्यामधून प्रथम आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावचा सुपुत्र कु. रितेश सचिन जाधव यांचा सत्कार शिरोडा,आरवली भाजप च्या वतीने करण्यात आला.

हा सत्कार या कार्यक्रमाचे मान्यवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (महाराष्ट्र राज्य शासन) प्राप्त श्री चंद्रकांत जाधव व भाजप, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख तथा शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, शिरोडा शहर अध्यक्ष तथा वेंगुर्ला तालुका कार्यकारणी सदस्य भाजप अमित गावडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाला तालुका उपाध्यक्ष भाजप लक्ष्मीकांत कर्पे, तालुका चिटणीस तथा शिरोडा बूथ क्र.८४ अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.हेतल गावडे,शिरोडा बूथ क्र.८५ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर,शिरोडा बूथ क्र.८६ अध्यक्ष प्रसाद परब,शिरोडा भाजप पदाधिकारी विदयाधर धानजी, जयानंद शिरोडकर,आरवली बूथ क्र.७८ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर, शिरोडा ग्रामस्थ संजय कडू, छत्रपती शाहू महाराज नगर शिरोडा मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मान्यवर चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सत्कार समारंभाचे सूत्रसंचलन शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख भाजप मयूरेश शिरोडकर यांनी केले.