कणकवली शहर भाजपच्यावतीने कणकवली पोलिसांना निवेदन
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
कणकवली : शहरात अवैधरित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाइन कॅशिनो, गुटखा, गोवा बनावटीची दारु विक्री व गांज्या – चरस अशा प्रकारचे अवैध धंदे सुरु आहेत. अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याने तरुण पिढी बरबाद होत आहे. कणकवली शहरात चालू असलेले अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी कणकवली शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन कणकवली पोलीस निरिक्षकांकडे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
अवैध धंद्याबाबत पोलीसांना वेळोवेळी माहिती देण्यात आलेली असून देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या धंद्यामुळे काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होत चालली आहे. त्यामुळे असे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत. अन्यथा कणकवली शहर भाजपच्या वतीने आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अण्णा कोदे यांनी दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, औदुंबर राणे, उदय यादव, कल्याण पारकर, निखिल आचरेकर आदी उपस्थित होते.












