राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील सौंदळ बारेवाडी येथील बेपत्ता असलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सांगाडा तब्बल तीन महिन्यांनंतर मिळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सुमती केशव मोरे असे मृत महिलेचे नाव असून त्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमती मोरे या ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सौंदळ येथील सौ. सुरेखा सुरेश राजापकर यांच्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. त्या मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्यामुळे नेहमीप्रमाणे वाडीतच कोठेतरी फिरत असाव्यात, अशा समजुतीने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.
मात्र, मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास सौंदळ येथील नामदेव किसन घाणेकर यांच्या मालकीच्या ‘चिवा’ बांबूच्या जागेत मानवी सांगाडा आढळून आला. या ठिकाणी हाडे, मानवी कवटी, साडी आणि बांगड्या विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या. प्राथमिक तपासात हे अवशेष बेपत्ता सुमती मोरे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात १३ जानेवारी २०२६ रात्री १०. ०७ वाजता आकस्मिक मृत्यू (A.D.) , बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस
Home ताज्या घडामोडी सौंदळ येथे बेपत्ता वृद्ध महिलेचे सांगाडा आढळला ; तीन महिन्यांनंतर धक्कादायक उलगडा












