चिपळूण तालुका गुरव समाजाचे १८ जानेवारी रोजी २७ वे स्नेहसंमेलन

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुका नितीवंत भाविक गुरव ज्ञाती समाजाचे २७ वे स्नेहसंमेलन रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी होणार असून या निमित्ताने चिपळूण तालुका गुरव समाजातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील गुरव समाजाच्या सभागृहामध्ये हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने श्रीसत्यनारायणाची महापूजा, ६ वाजता अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सलग २७ व्या स्नेहसंमेलनच्या निमित्ताने शनिवारी १७ जानेवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार असून रविवारी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. शनिवारी १७ जानेवारी रोजी श्रींची पुजा,घटस्थापना, गाथा पुजन, वीणापूजन, ध्वजारोहण, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, दीपोत्सव, किर्तन आणि हरिजागर इ.विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १८ जानेवारी रोजी काकडा आरती, काल्याचे किर्तन, महिला मंडळ हळदीकुंकू समारंभ, मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थी गुणगौरव आणि लकी ड्रॉ सोडतीचा कार्यक्रम होणार असून गुरव समाजाच्या वतीने कोळकेवाडी येथील यशवंत कृष्णा कदम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्नेहसंमेलनाला चिपळूण तालुक्याचे आमदार श्री.शेखर निकम,माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण,वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन आणि भाजपचे नेते श्री.प्रशांत यादव,चिपळूणचे नगराध्यक्ष श्री.उमेश सकपाळ,चिपळूण शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख श्री.बळीराम गुजर,रत्नागिरी जिल्हा भाजप उपाध्यक्ष बळीराम मोरे, कृष्णा ॲन्टीऑक्साईड कंपनी खडपोलीचे व्यवस्थापक अशोक पाटील, थ्री एम.पेपर मिलचे हितेंद्र शहा, जिल्हा परिषद माजी सभापती विनोद झगडे, जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोक कदम, माजी सभापती सौ.पुजा निकम, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, विद्यमान नगरसेवक अजय भालेकर, माजी पंचायत सदस्य विश्वनाथ साळवी, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, पिंपळीच्या सरपंच सौ.अंजली जांबुर्गे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे, गुरव समाज (मुंबई) माजी अध्यक्ष आणि दादर गावचे सुपुत्र सुनिल पवार, गुरव समाज (पुणे)चे अध्यक्ष सुरेश शिंदे, रत्नागिरी जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक (मुंबई) आणि दादर गावचे सुपुत्र सुशील सकपाळ, कनिष्ठ अभियंता समीर कदम, उद्योजक शशांक पवार, रत्नागिरी जिल्हा हरिओम सत‌्नाम वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष अरविंद महाराज चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विकास गुरव, ॲडव्होकेट अशोक निकम, चिपळूण तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निलेश कदम, भाजप नेते संतोष नलावडे, रत्नागिरी जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश गुरव, चिपळूण तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनाला विविध समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चिपळूण तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष तुकाराम गुरव, उपाध्यक्ष प्रकाश पवार, खजिनदार चंद्रकांत जाधव, सचिव लवु बडदे आणि गुरव समाजाचे संचालक मंडळ, विश्वस्त, सल्लागार आणि समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.