आचरा–अर्जुन बापर्डेकर
विद्यार्थ्यांना अनुभूतीयुक्त शिक्षण दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या बौद्धिक विकासावर होतात. याहेतूनेच पुस्तकी ज्ञानासोबत अनुभूती शिक्षण प्राप्त होण्यासाठी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी आचरा पोष्ट ऑफिस कार्यालयास भेट देत मोबाईल युगातही सुरु असलेल्या पत्रव्यवहार , पोस्टाच्या विविध योजना,पत्रांचे प्रकार, पार्सल सुविधा, वेगवेगळे स्टॅम्प इ.बाबत सखोल माहिती घेतली.यावेळी पोष्ट मास्तर अरुण साळवी श्रीमती रुनीता आरोलकर यांनी मुलांना पोस्टाच्या विविध योजना, पत्रांचे प्रकार आदीबाबत माहिती दिली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांसह अन्य सदस्य शिक्षक आदी उपस्थित होते.














