फोंडाघाटची कॅडेट मनस्या फाले हिला मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान !

कोल्हापूर मुख्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे ग्रुप कमांडर ब्रिग्रे. राजकुमार पैठणकर यांचे हस्ते धनादेश वितरण !

मनस्या न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या एन.सी.सी. विभागाची सुवर्णकन्या —

फोंडाघाट /कुमार नाडकर्णी —
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाटची कॅडेट मनस्या निलेश फाले, हिला प्रतिष्ठित मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वितरित केल्या जाणाऱ्या केवळ १५ शिष्यवृत्तींपैकी ही एक आहे.

शिष्यवृत्ती वितरण समारंभ नुकताच एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूर येथे पार पडला, जिथे राष्ट्रीय छात्र सेनेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर राजकुमार पैठणकर यांच्या हस्ते कॅडेट मनस्याला शिष्यवृत्तीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.कॅडेटच्या या कामगिरीसाठी ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज एल., प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल तनुज मांडलिक आणि शाळेचे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी सेकंड ऑफिसर आर्या भोगले, सेकंड ऑफिसर मारुती लाड, क्रीडा शिक्षक अजिंक्य पोकळे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि शाळा समिती चेअरमन, संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. के. पारकर, पर्यवेक्षक श्री. व्हि. पी. राठोड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी यांनी मनस्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. फोंडाघाट पंचक्रोशीतून मनस्याच्या या यशाचे खूप कौतुक होत आहे.