चांदेराई-कुरतडे रस्त्यावरील पडक्या शेडमध्ये अवैध दारू विक्री; महिलेवर ग्रामीण पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला पडक्या शेडमध्ये बेकायदेशिरपणे गावठी दारुची विक्री करणाऱ्या महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.50 वा.सुमारास करण्यात आली.
याबाबत महिला पोलिस हेड काँस्टेबल योगिता नाटूस्कर (38) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला ही बेकायदेशिरपणे 900 रुपयांची 9 लिटर गावठी दारु विक्री करण्यासाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.