दोडामार्गमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू; पहिल्या दिवशी १० अर्जांची विक्री

दोडामार्ग प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच दोडामार्ग तालुक्यात ग्रामीण राजकारणाने वेग घेतला आहे. नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसला, तरी १० अर्जांची विक्री झाल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे

​अर्ज दाखल करण्याचा कालावधी हा १६ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यत आहे
​पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही, मात्र १० अर्जांची विक्री झाली आहे याबाबत
​प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे याबाबत महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी अर्जांबाबत अधिकृत माहिती प्रहारशी बोलताना दिली.
​उमेदवारांसाठी मोठी सोय
​आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणीसाठी आवश्यक असलेला १५-अ अर्ज आता थेट तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांची धावपळ थांबणार असून कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणे सोपे होणार आहे.
​राजकीय हालचाली वाढल्या
​अर्ज भरण्यासाठी आता केवळ ५ दिवस शिल्लक असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत तहसील कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. “निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक गट आता सक्रिय झाले असून, आगामी काळात ही चुरस आणखी वाढणार आहे,” असे संकेत मिळत आहेत.