सावंतवाडी: महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ मध्ये सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलने १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही स्तरांवरील परीक्षांत विद्यार्थ्यांनी उत्तम श्रेणी प्राप्त केली आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये कु. गार्गी किरण सावंत आणि कु. पलक प्रशांत पाटणकर या विद्यार्थिनींनी ‘अ’ श्रेणी मिळवली. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत आणि ११ विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.
इंटरमिजिएट परीक्षेत एकूण २३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी कु. अमित वागाराम सुंदेशा, भूमी गुरुदत्त कामत, काव्या संतोष मडवळ, मृण्मयी मिलिंद तानावडे आणि स्वरदा सिद्धार्थ पराडकर या ५ विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी पटकावली. तसेच ८ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत आणि १० विद्यार्थी ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री. संदेश कळंगुटकर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकास भाई सावंत, सीईओ श्री. बाळासाहेब नंदिहळळी, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. मनोहर वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक श्री. समीर परब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.











