तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

मंडणगड प्रतिनिधी – राज्यातील महानगरपालीकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवीलेल्या यशाचे आनंद तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व नागरीकांना पेढे वाटून साजरा केला (16) जानेवारी 2026 रात्री उशीरा निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते शहरातील बाजारपेठेत गोळा झाले यावेळी घोषणा देत फटाके फोडण्यात आले व नागरीकांना पेढे वाटून विजयाचा आनंदा साजरा करण्यात आला यावेळी माजी तालुका अध्यक्ष सचिन थोरे, महेश कंचावडे, वैभव नारकर, आकाश नाविलकर, रामदास भागडे, शैलेश तपकिरे, आनंद नारकर, राजेश पारेख, अनिल कुंभार आदी उपस्थित होते.
.