वारकरी भूषण, कीर्तनकार हभप शंकरनाना मोरे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : नवसाला पावणा-या करूळ भोयडेवाडी येथील गजराजेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दि. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कीर्तनकार, वारकरी भूषण, भजनरत्न हभप शंकरनाना महाराज मोरे सातारा यांचे कीर्तन पार पाडणार आहे. तसेच जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी 6 वा. अभिषेक, 8 वा. महाआरती, 9 वाजता पालखी मिरवणूक, 9:30 वा. सत्यनारायण महापूजा, 12:30 ते 3वा. महाप्रसाद, दुपारी 3 वा. सुस्वर भजने, 6.30 वा पालखी मिरवणूक, 7 वा. हरिपाठ, 8 वा. महाआरती, 9 वा. कीर्तनकार हभप शंकरनाना महाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे.
तरी या यात्रेनिमित्त परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.









