भेडशी खालचा बाजार रस्ता पाणी साचल्याने वाहतूकीस बंद

 

दोडामार्ग सुहास देसाई

गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून साटेली भेडशी येथील भेडशी खालचा बाजार रस्त्यावर पाणी साचल्याने तिलारी ते दोडामार्ग वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती त्यामूळे सदर रस्ता बंद करण्यात आला होता या रस्त्याला अर्धा किलोमीटर पर्यंत रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते

भेडशी खालचा बाजार येथिल् पुलाच्या चारही बाजूंनी पाणी साचून राहत असल्याने सध्या सृरू असेलेल्या पावसाच्या पाण्याचा विचार केला असता हे पाणी बाजार पेठेत व तेथील जवळ असलेल्या वस्तीतील घरातपाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन् जनजीवन विस्कळीत होऊ शकते. हे घडू नये यासाठी वेळीच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी योग्य नियोजन करून साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे तसेच साचलेल्या पाण्याची निचरा होण्यासाठी व्यवस्था करून होणारे रस्त्यावरील अपघात टाळावे अशी मागणी भेडशी खालचा बाजार ग्रामस्थानी केली आहे.