परुळे | प्रतिनिधी
परुळे तेलीवाडी येथील सिद्धिविनायक कला मंदिरात वरती वडाचे भले मोठे झाड कोसळून गणेश मूर्तींचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या चार पिढ्या तेली कुटुंबीय गणेश मूर्ती घडविण्याचा व्यवसाया बरोबरच आपली कला जोपासत आहेत. आणि चौथ्या पिढीतील सिद्धिविनायक तेली यांनी कागदाच्या लगद्यापासून व शाडू माती पासून गणेश मूर्ती बनवून मुंबई व परदेशात पाठविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र वडाचे भले मोठे झाड आज त्यांच्या गणेश मूर्ती शाळेवर कोसळले आणि मोठे नुकसान झाले आहे.













