मसुरे (प्रतिनिधी ): मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र जोशी (71 वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे जोशी काका जनमानसात लोकप्रिय होते. त्यांनी श्री महागणपती मंदिरास २ गुंठे जागा बक्षिसपत्राने मोफत दिली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.













