“पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट” तर्फे पावणादेवी येथे दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ब्लड प्रेशर आणि डायबेटिस च्या रुग्णांना मोफत तपासणी करून संस्थेच्या वतीने औषधाचे वितरण करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी संस्थेचे अधिकारी हिरबा विश्वनाथन सावंत, श्रीया श्रीकांत सावंत, मनाली मनोज सावंत, पंडित प्रभाकर परब, आशा सेविका श्वेता गणेश तेली, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य धुरी मॅडम, सायली तेली, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबेटिस ची तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली असून वेळेवर डायबेटिस आणि ब्लड प्रेशर तपासणीचे महत्त्व समजले आहे असे “पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट” च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढेही समाजासाठी असे उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नवनियुक्त आशा सेविका सौ.श्वेता गणेश तेली हिचा उपस्थितांकडून सत्कार करण्यात आला.
फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंच मा. सौ संजना आग्रे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.
स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे आभार मानले. यावेळी सुनील तारळेकर, किशोर केळुसकर, पांडुरंग येरम, संजय तेली, दशरथ रेडकर, विजय परब, हर्षद केळुसकर, गणेश तेली, स्वप्नील गवळी आदी उपस्थित होते











