वैभववाडी भाजपा कार्यालयाचे नाम. नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. जुन्या कार्यालयाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. या कार्यालयात प्रशस्त हॉल, पदाधिकारी बैठक व्यवस्था, अशा पद्धतीने सुसज्ज कार्यालय बनविण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, संजय सावंत, मंगेश लोके, श्रद्धा रावराणे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, रितेश सुतार व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.