रत्नागिरी: ‘स्पॅरियन एंटरटेनमेंट’ निर्मित आगामी ‘स्पंदन’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोकणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण शेट्ये करत असून, संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे.
अभिनेत्री प्रीती मल्लापूरकर यांनी याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “स्वतः रत्नागिरीची कन्या असल्याने आपल्याच मातीत येऊन चित्रपटाचे काम करणे हा एक वेगळा आणि सुखद अनुभव आहे.” दिग्दर्शक प्रवीण शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटात चिपळूणसह जिल्ह्यातील विविध भागांतील स्थानिक कलाकारांना मोठी संधी देण्यात आली आहे. कोकणातील निसर्ग आणि येथील टॅलेंटला जागतिक स्तरावर पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

चित्रपटाचे निर्माते श्रीकांत कोथिंबिरे हे या उद्योगातील सर्वात तरुण निर्मात्यांपैकी एक असून, त्यांनी अतिशय आशयघन विषयाची निवड केली आहे. रत्नागिरीच्या विविध लोकेशन्सवर चित्रीकरण सुरू असून, प्रवीण शेट्ये यांचे दिग्दर्शन आणि कोकणची पार्श्वभूमी असलेला ‘स्पंदन’ चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच एक वेगळी पर्वणी ठरेल.
Home महत्वाच्या बातम्या कोकणच्या मातीत घुमणार ‘स्पंदन’चा आवाज; रत्नागिरीत मराठी चित्रपटाचे भव्य चित्रीकरण सुरू!











