चौके l प्रतिनिधी:- मालवण तालुक्यातील आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 2 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्त सकाळी श्री देव जैन सकलेश्वर देवाची पूजा केली जाते. दिवसभर भाविक भक्तांकडून मोठ्या भरण्याचा कार्यक्रम चालू असतो सायंकाळी चौके ग्रामदेवता व सकलेश्वर देवाची बहीण श्री भराडी देवी यात्राउत्सवाच्या निमित्ताने वर्षाने एकदा आपल्या सकलेश्वर भावाला भेटण्यासाठी मंदिरात येते यानंतर मुख्य जत्रा सोहळ्याला सुरुवात होते.रात्रौ देवाची महाआरती करून मंदिरा सभोवताली पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचा पारंपारिक नाट्य प्रयोग सादर केला जातो सकाळी गाडगे फोडून जत्रोत्सवाची सांगता होते













