मसुरे येथे सेवानिवृत पोलीस पाटिलांचा सन्मान!

मसुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट गावचे पोलीस पाटील श्री विजय पालव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने मसुरे पोलीस दुरक्षेत्र येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पोलीस अंमलदार श्री संजय हुंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी पोलीस पाटील शिवाजी गावडे ( महान ), विकास सावंत ( बिळवस ), पांडुरंग तांडेल ( मालोंड ) यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि समाज यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील जबाबदारीने काम करत असतात. सेवा निवृत झालेल्या पोलीस पाटील यांच्या अनुभवाचा फायदा नव्याने रुजू झालेल्या पोलीस पाटील यांनी घ्यावा असे प्रतिपादन यावेळी पोलीस अंमलदार संजय हुंबे यांनी यावेळी केले.

यावेळी मसुरे बिटचे अंमलदार श्री संजय हुंबे आणि मसुरे बिटमधील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी मान्यवरानी मनोगत व्यक्त करून निवृत्त पोलीस पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.