मुणगे हायस्कुल तिठा येथे 20 रोजी सत्यनारायण महापूजा! 

 

मसुरे (प्रतिनिधी ):

रिक्षा चालक-मालक संघ मुणगे भगवती हायस्कूल तिठा यांच्या वतीने २० जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा हायस्कुल तिठा येथे आयोजित केली आहे. यनिमित्त सकाळी ०९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी १०.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने,

रात्रौ ठीक १० वाजता

ओमकार नटेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कालेली कुडाळ यांचे विनोदी, संघर्षमय, रहस्यमय दशावतार नाटक

‘हस्तीकेश्वर हनुमान’ होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.