ग्रामस्थ व शाळा यांनी मानले, पालकमंत्री- एसटी प्रशासन- जागृती केलेली चॅनेल, पत्रकार आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार !
पर्यायी मार्गाची पाहणी करून, एस.टी वाहतूक कायमस्वरूपी सुरू ठेवावी. विद्यार्थी,ग्रामस्थ, व्यापारी यांची आग्रही मागणी !
फोंडाघाट / कुमार नाडकर्णी– रविवारी फोंडा – कोल्हापूर घाट मार्गाने चालू असलेली एसटी वाहतूक, शासनाने या रस्त्यावरील दोन ब्रिज रुंदीकरणासाठी पाडण्यात येणार आहेत म्हणून बंद केली. या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले.या एसटी प्रशासनाच्या मनमानी आदेशाचा फोंडावासीयांनी निषेध व्यक्त केला. शाळा, व्यापारी, हसणे गावाच्या रहिवाशांपासून कित्येक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एसटी प्रशासन यांना निवेदन देऊन त्वरित एसटी चालू करणे साठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.व्यापारी, ग्रामस्थ, रुग्णांची गैरसोय टाळावी अशी आग्रही मागणी केली …
या जनरेट्याला लक्षात घेऊन, एसटी प्रशासनाने सर्व स्थानक प्रमुखांना एसटी वाहतूक पूर्ववत चालू करावी, असे आदेश दिल्याने,आज गाड्या पूर्ववत सुरू झाल्या.त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. वस्तुतः पर्यायी सुरक्षित मार्ग सुरू झाल्यानंतर ब्रिज पाडण्यात येणार असल्याचे डेप्युटी इंजिनिअर प्रभू यांनी जनतेसमोर स्पष्ट केले होते. मात्र एसटी प्रशासनाने पर्यायी मार्गाची तपासणी पथक पाठवून पाहणी करणे गरजेचे होते. काही गाड्या वैभववाडी मार्गे तिकीट यंत्रातील डेटा त्या मार्गे भरल्याने आज पाठवण्यात आल्या. त्या सुद्धा याच मार्गाने डेटा भरून पाठवण्यात याव्यात.यापुढे ब्रिज पाडल्यानंतर पर्यायी रस्त्याची पाहणी करून एसटी वाहतूक कायम सुरू ठेवावी, आणि गैरसोय टाळावी अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे… अचानक गाड्या बंद करू नयेत….












