राजापुरात महायुतीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या नावाची घोषणा

बुधवारी महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा महायुतीकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या आदेशनानुसार महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी मंगळवारी सायंकाळी ही यादी जाहीर केली आहे. महायुतीचे सर्व उमेदवार बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती नागले यांनी दिली.